भरतीबाबत प्रश्न विचारणार्‍या महिला उमेदवाराला थेट अपात्रतेची धमकी देणे केसरकारांना शोभत नाही…

सावली पाटकर:संबंधित महिलेसह डी. एड., बी. एड बेरोजगारांची केसरकरांनी जाहीर माफी मागावी..

⚡सावंतवाडी,ता.२९-: शांत आणि संयमी म्हणून ओळख असलेल्या शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्याकडून शिक्षक भरतीबाबत प्रश्न विचारणार्‍या महिला उमेदवाराला थेट अपात्रतेची धमकी देणे शोभत नाही. त्यांनी संबंधित महिलेसह डी. एड., बी. एड बेरोजगारांची जाहीर माफी मागावी, असे आवाहन सिंधुदुर्ग युवती राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा सौ. सावली पाटकर यांनी केले आहे.

शिक्षक भरती तांत्रिक प्रक्रियेत अडकल्याने हजारो उमेदवाराचे भवितव्य अंधारात आहे. त्यामुळे ज्याचे जळते त्यालाच कळते ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे नाहक चिडण्यापेक्षा केसरकरांनी आपली जबाबदारी ओळखून त्या उमेदवारांच्या भवितव्यासाठी योग्य तो निर्णय घ्यावा,
केसरकर साहेब आपल्या जिल्ह्यातील डी.एड, बी.एड, धारक आपल्या म्हणण्याप्रमाणे श्रद्धा आणि सबुरी नेच चालत आहेत याचाच हा गैरफायदा आपण अजून किती दिवस घेणार आता होऊ घातलेल्या निवडणुकीच्या वेळी जर ह्याच मतदारांनी श्रद्धा आणि सबुरीने घेऊया असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही याचीही दखल भविष्यातील नेते मंडळींनी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे

असेही पाटकर यांनी म्हटले आहे.
बीड मध्ये आयोजित एका कार्यक्रमात शिक्षणमंत्री केसरकर यांना एका महिला उमेदवाराने शिक्षण भरती बाबत प्रश्न विचारला होता. मात्र त्या प्रश्नाला उत्तर द्यायचे सोडून शिक्षण मंत्री केसरकर यांनी तिला थेट अपात्र करण्याची धमकी दिली होती. या पार्श्‍वभूमीवर सौ. पाटकर यांनी त्यांना हा सल्ला दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार शिक्षक भरती तांत्रिक प्रक्रियेत अडकल्याने संबंधित उमेदवाराचे भवितव्य अंधारात आहे. त्यामुळे ज्याचे जळते त्यालाच कळते, या उक्ती प्रमाणे त्या महिलेने शिक्षण मंत्र्यांना प्रश्न विचारला. त्यात धमकी देण्याऐवढे काही नव्हते. तर दुसरीकडे आपल्या मतदार संघात शांत आणि संयमी असणार्‍या शिक्षणमंत्र्याकडून धमकींची अपेक्षा नव्हती.

You cannot copy content of this page