उमेश सावंत:भाजपा किसान मोर्चाच्या वतीने पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या कडे केली मागणी..
⚡वेंगुर्ले ता.२९-: फळपीक विमा योजनेसाठी विमा रक्कम भरण्याची मुदत ३० नोव्हेंबर पर्यंत आहे . मात्र जिल्ह्यातील अनेक शेतकरी गतवर्षीच्या विमा लाभापासून वंचित आहेत . तसेच सर्व्हर डाऊन असल्यामुळे ऑनलाईन विमा ज्या साईटवर भरला जातो , ती साईट २४ नोव्हेंबर पासून आजतागायत बंद आहे . त्यामुळे चालु वर्षीचा विमा भरण्यास शेतकरी वंचित रहाणार आहेत.म्हणून किमान १५ दिवसाची मुदतवाढ मिळावी , अशी मागणी भाजपा किसान मोर्चाच्या वतीने जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचेकडे केली .
या मागणीची दखल घेत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे विशेष कार्य अधिकारी संतोष साखरे यांनी तात्काळ जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांचेशी चर्चा करून मुदतवाढीचा प्रस्ताव कृषी आयुक्तांना सादर करण्यास सांगीतला . तसेच मंत्रालय स्तरावर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचेशी पालकमंत्री रविंद्र चव्हाण चर्चा करून मार्ग काढतील असे आश्वासित केले .
ओरस मुख्यालय या ठिकाणी झालेल्या चर्चेत किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई , कोषाध्यक्ष चारुदत्त देसाई , माजी सभापती निलेश सामंत , मालवण किसान मोर्चाचे महेश सारंग उपस्थित होते .
