संस्कृत विषयात प्रथम येणाऱ्यास प्रोत्साहनपर पारितोषिक….

*💫मालवण दि.१३-:* पुढील वर्षी सन २०२२ पासून मालवण केंद्रावरील मराठी माध्यमातून इयत्ता दहावी च्या परिक्षेमध्ये संपूर्ण संस्कृत विषय घेऊन प्रथम येणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थीनीला प्रत्येकी रूपये १० हजार विशेष प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात येणार आहे. यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे इयत्ता १० वीच्या अंतिम परिक्षेबाबत अनिश्चिततेचं वातावरण आहे. तरीही या परिस्थितीत सुधारणा होऊन अंतिम परिक्षा झालीच तर या ही वर्षांपासून हे पारितोषिक देण्यात येईल, अशी घोषणा अमेरिकास्थित विजय नारिंग्रेकर यांनी केली आहे. हे पारितोषिक डॉ.नारिंग्रेकर ट्रस्ट यांच्यावतीने आणि नगर वाचन मंदिराच्यामार्फत दिले जाणार, अशी माहिती नगर वाचन मंदिर याचे ग्रंथपाल संजय शिंदे यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page