*सावंतवाडीत तीन ठिकाणी मटक्यावर स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई

*💫सावंतवाडी दि.१३-:* स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाकडून आज सावंतवाडी शहरातील तीन ठिकाणी मटक्यावर धाड टाकत कारवाई केली आहे. या वेगवेगळ्या कारवाईत एकूण ५ हजार ७०० रुपयांची रोकड व साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत तीन व्यक्ती विरोधात पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक देसाई, सुधीर सावंत, प्रकाश कदम, प्रवीण वालावलकर, अनिल धुरी, अमित पालकर, ज्ञानेश्वर कांदळगावकर आदींनी केली आहे.

You cannot copy content of this page