धर्मवीर बलिदान मासानिमित्त रेडी येथे उद्या रक्तदान शिबिराचे आयोजन

*संभाजी महाराजांच्या बलिदानाचे स्मरण व्हावे यासाठी शिवप्रेमी यशवंतगड यांच्याकडून करण्यात आले आयोजन

*💫वेंगुर्ले दि.१३-:* धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त यशवंत गड रेडी यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून, या रक्तदान शिबिरास येऊन रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी याच मासा मध्ये ( फाल्गुन शु. प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या) हिंदु धर्माच्या व स्वराज्याच्या रक्षणासाठी आतोनात हाल सहन करत आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते. त्यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण आजच्या युवा पिढीला राहावे यासाठी या रक्तदान शिबिराचे आयोजन शिवप्रेमी कडून करण्यात आले आहे. रेडी येथील रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर याठिकाणी उद्या रविवार दिनांक १४ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजे पर्यंत करण्यात आले आहे. तरी पंचक्रोशीतील शिवप्रेमींनी रक्तदान करावे असे आवाहन केले आहे.

You cannot copy content of this page