फळपीक विमा योजनेचे फॉर्म भरण्यास अडचणी येत असल्याने मुदतवाढ वाढवून द्या..

रुपेश राऊळ: कृषी अधिकारी युवराज भुईम्बर यांच्याकडे केली मागणी..

⚡सावंतवाडी ता.२८-: तालुक्यातील नव्याने भरण्यात येणारे फळपीक विमा योजनेचे फॉर्म भरण्यास शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत त्यामुळे त्या साईडवर येणारा लोड त्या तांत्रिक बाबी दूर करून 30 नोव्हेंबरपर्यंत देण्यात आलेली मुदतवाढ देखील वाढवून द्यावी, अशी मागणी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी यावेळी संबंधित कृषी विभागाचे अधिकारी युवराज भुईम्बर यांच्याकडे आज येथे केली.

दरम्यान ही मुदतवाढ न मिळाल्यास अनेक शेतकरी फळ विमा पीक पासून वंचित राहू शकतात त्यामुळे याची दखल गुण आपण त्वरित वरिष्ठ स्तरावर देखील मागणी करावी तसेच आम्ही देखील मागणी करणार असल्याचे देखील राऊळ यांनी सांगितले. दरम्यान राज्यात इतर ठिकाणी कोणती अडचणी येत नसताना फक्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्येच फॉर्म भरण्यास अडचणी येत आहेत त्यामुळे कुठेतरी कोकणी जनतेवर अन्याय तरी करत नाही ना असा सवाल देखील श्री राऊळ यांनी उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांना विचारले.

You cannot copy content of this page