कोरोना प्रतिबंधात्मक दोन्ही लसी सुरक्षित; ज्येष्ठ नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात टोचून घ्यावी लस

*नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे आवाहन*

*💫कणकवली दि.१३-:* कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 100 टक्के सुरक्षित असलेल्या कोव्हीशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लस सध्या उपलब्ध आहेत. या दोन्ही लसी 100 टक्के सुरक्षित असून 45 वर्षावरील गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांनी आणि 60 वर्षावरील कणकवलीच्या सर्व शहरवासीयांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लस टोचून घ्यावी असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे. 60 वर्षावरील नागरिकांनी आपले आधारकार्ड घेऊन लस घेण्यासाठी जावे. 45 वर्षांवरील गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांनी आपली आजाराची फाईल घेऊन जावे. सकाळी 9 ते 5 या वेळेत कणकवली उपजिल्हा रुग्णालयात कोव्हीड लसीकरण सुरू आहे. निकषात बसणाऱ्या कणकवली शहरवासीयांनी कटाक्षाने कोव्हीड लस घ्यावी असे आवाहन नगराध्यक्ष नलावडे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page