पारंपरिक मच्छीमारांच्या त्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेऊ – आ. अस्लम शेख

मंत्र्यांच्या आश्वासनानंतर देखील मच्छीमारांचे दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरू

*💫मालवण दि.१३-:* सिंधुदुर्गाच्या समुद्रात एल इ डी दिव्यांच्या सहाय्याने होत असलेल्या बेकायदेशीर पर्ससीन मच्छिमारी तत्काळ बंद होण्याबाबत पारंपरिक मच्छीमारांनी मालवणच्या सहाय्यक मस्य व्यवसाय आयुक्त कार्यालयासमोर सुरू केलेल्या साखळी उपोषणाची माहिती राज्याचे मत्स्यविकासमंत्री अस्लम शेख यांना मिळताच त्यांनी काल शुक्रवारी रात्री पारंपरिक मच्छीमारांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. पारंपरिक मच्छीमारांच्या या प्रश्नांवर आपण बुधवारी मंत्रालयात बैठक घेऊन ठोस निर्णय घेऊ असे सांगत उपोषण मागे घेण्याचे आवाहन मंत्री महोदयांनी केल्याची माहिती राष्ट्रीय काँग्रेसचे मालवण तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांनी दिली आहे मंत्री महोदयांनी जरी आश्वासन दिले असले तरी पारंपरिक मच्छीमारांनी आंदोलन मागे घेण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही त्यामुळे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू आहे.

You cannot copy content of this page