अटीतटीच्या सामन्यात आर्वी कोरगाव संघ विजयी

तर ओमसाई दाभोली केरवाडा संघ उपविजेता; वेत्ये येथे आयोजित करण्यात आली होती स्पर्धा

*💫सावंतवाडी दि.१२-:* श्री कलेश्वर युवा कला क्रीडा मंडळ वेत्ये आयोजित क्रिकेट स्पर्धेत आर्वी कोरगाव संघाने बाजी मारत विजेतेपद पटकावले आहे. तर ओमसाई दाभोली केरवाडा संघाने उपविजेतेपद पटकावले आहे. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात शेवटच्या दोन चेंडूत १३ धावांची आवश्यकता असताना दोन्ही चेंडूवर खणखणीत दोन षटकार मारत संदेश ठाकूर ने आपल्या संघाला विजय संपादन करून दिला आहे. या स्पर्धेचे बक्षीस वितरण शिवसेना नेते अतुल रावराणे, शिवसेना तालुका प्रमुख रूपेश राऊळ, गितेश राऊत, युवासेना जिल्हा विस्तारक अमित पेडणेकर, वेत्ये सरपंच स्नेहा मिठबावकर, उपसरपंच गुणाजी गावडे, बाळू गावडे, बाळू गावकर, मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर, शिवसेना गटनेते नागेंद्र परब, युवासेना अधिकारी सागर नानोस्कर, जितेंद्र गावकर, कुडाळ शिवसेना शहर प्रमुख संदीप महाडेश्वर, शेरले सरपंच जगन्नाथ धुरी, रोनापाल सरपंच सुरेश गावडे, युवासेना तालुका अधिकारी योगेश नाईक, ओवळीये सरपंच विनायक सावंत, मंडळाचे अध्यक्ष राजन आंबेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page