*आठ दिवसांत त्या रस्त्याचे काम मार्गी न लागल्यास ठिय्या आंदोलन

चौकुळ सरपंच सुरेश शेट्ये आणि माजी सरपंच गुलाबराव गावडे यांचा बांधकाम विभागास इशारा

*💫आंबोली दि.१२-:* आंबोली चौकुळ, तेरवण, रामघाट रस्ता, तसेच नेनेवाडी रस्ता दुरुस्तीचे काम मंजूर असूनही केवळ ठेकेदारांच्या ढिसाळ नियोजनामुळे संबंधित ठेकेदाराने अजूनही सुरू केले नाही. असा आरोप चौकुळ सरपंच सुरेश शेटवे व माजी सरपंच गुलाबराव गावडे यांनी केला आहे. या रस्त्याची चाळण झाल्याने या रस्त्यावरून वाहन चालवणे देखील कठीण बनले आहे. याच कारणामुळे चंदगड, इसापूर चौकुळ ही बस सेवा देखील सुरू होऊ शकली नाही आहे. असे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे. या कामासाठी आलेल्या निधी देखील मार्च एडींग असल्याने पुन्हा परत जाण्याची भीती देखील त्यानी यावेळी व्यक्त केली आहे. याच कारणामुळे आज चौकुळ सरपंच सुरेश शेटवे व माजी सरपंच गुलाबराव गावडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात उप अभियंता आवटी यांची भेट घेत याबाबत जाब विचारलं आहे. तसेच संबंधित ठेकेदाराला संपर्क करत येत्या आठ दिवसांत त्या रस्त्याचे काम मार्गी न लागल्यास कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू असा इशारा देखील सरपंच सुरेश शेट्ये आणि माजी सरपंच गुलाबराव गावडे यांनी दिला आहे. तर याच मुद्द्यावर पंचायत समिती सदस्य मोहन चव्हाण यांनी देखील संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत संबंधित ठेकेदार पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नका असे ठणकावून सांगितले आहे.

You cannot copy content of this page