Headlines

महाशिवरात्री निमित्त श्री देव रामेश्वराच्या पिंडी भोवती १५ थरांची अक्षतांची महापूजा

मालवण दि प्रतिनिधी मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीदिवशी श्री देव रामेश्वराच्या पिंडी भोवती १५ थरांची अक्षतांची (तांदळाची) महापूजा बांधण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यात कुठेही अशा प्रकारची तांदळाची महापूजा पाहण्यास मिळत नसल्याने रामेश्वर मंदिरातील ही अक्षतांची पूजा लक्ष्यवेधी ठरली आहे मालवण देऊळवाडा येथील श्रीदेव रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त प्रतिवर्षी प्रमाणे पुराण वाचन, कीर्तन, भजने, पालखी मिरवणूक असे अनेक धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. या सर्व कार्यक्रमांचे मुख्य आकर्षण म्हणजे महाशिवरात्री दिवशी रात्री ११ ते १२ या वेळेत गाभाऱ्या तील शंकराच्या पिंडीभोवती बांधण्यात येणारी १५ थरांची तांदळाची महापूजा पूर्वीच्या काळी हि महापूजा बांधण्या करिता पिंडीभोवती माडाच्या झावळाच्या चुड्तीचा उपयोग केला जात असे. पण काही वेळा तांदळाच्या वजनाने हि चुड्तीची रिंग तुटत असल्याने महापूजा बांधण्यात व्यत्यय येत असे. त्यामुळे अलीकडच्या काळात चुड्तीच्या रिंगाऐवजी सोन्याचा मुलामा दिलेल्या चांदीच्या रिंगा वापरून अतिशय आकर्षक महापूजा बांधण्यात येते. या महापुजेमध्ये तांदळाचे एकावर एक असे १५ थर असतात. प्रत्येक थरावर बेलपत्र व शेवटच्या थरावर सोन्याचे पान ठेऊन ही महापूजा सजवली जाते. यावेळी कीर्तनकार ध्रुवकुमार रानडे यांनी कीर्तन केले पूजा बांधून झाल्यानंतर गावकर मंडळी व मानकऱ्याकडून गाऱ्हाणी घालण्याचा कार्यक्रम करण्यात आला. हा संपूर्ण धार्मिक कार्यक्रम कोरोनाचे नियम पाळून करण्यात आला

You cannot copy content of this page