भरपाई देण्याची संतोष मोर्ये यांची मागणी…
⚡दोडामार्ग, ता.१७-:
अवकाळी पावसाने भातशेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई द्या,अशी मागणी शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उपतालुकाप्रमुख संतोष मोर्ये यांनी केली आहे.
तालुक्यातील भातशेती पिकली होती.भातपीक कापणीला आले होते आणि अचानक अवकाळी पाऊस कोसळू लागला.काही ठिकाणी पावसामुळे कापणी न केलेले भातपीक जमिनीवर आडवे पडून पाण्यात फुगले आणि लोंब्यांना कोंब आले.काही ठिकाणी कापलेले भातपीक घरी नेता न आल्याने पावसात कुजले, भाताच्या लोंब्या घळून गेल्या आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले.त्या सगळ्या शेतकऱ्यांना शासनाने तत्काळ भरपाई द्यावी अशी मागणी मोर्ये यांनी केली आहे.
