ग्रामपंचायत मधील सरपंच व सदस्यांचा भाजपच्या वतीने 17 रोजी सत्कार…

भाजप प्रदेश सरचिटणीस आम. श्रीकांत भरतीय यांची उपस्थिती: सावंतवाडी विधानसभा संपर्क कार्यालय येथे आयोजन..

⚡सावंतवाडी ता.१५-: येथील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत मधील नवनिर्वाचित सरपंच आणी सदस्य यांचा सत्कार सोहळा सावंतवाडी विधानसभा कार्यालय येथे शुक्रवार दि. १७ रोजी , सकाळी ९.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

दरम्यान महाविजय २०२४ चे राज्य संयोजक व भाजपा प्रदेश सरचिटणीस आम.श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते सावंतवाडी विधानसभा कार्यालय येथे हा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे.

या निमित्त जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, विधानसभा प्रमुख राजन तेली, महीला जिल्हाध्यक्ष श्र्वेता कोरगावकर, डॉ. अमेय देसाई , जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, जिल्हा उपाध्यक्ष संजू परब तसेच जिल्हा पदाधिकारी , जिल्हा कार्यकारिणी सदस्य, विधानसभेतील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करण्याकरिता तसेच विधानसभेतील विकासकामांच्या चर्चेकरिता सर्व सुपर वॉरियर्स , पदाधिकारी , शक्तिकेंद्र प्रमुख , तालुका स्तरीय विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन सुधीर दळवी , सुहास गवंडळकर , रविंद्र मडगांवकर , अजय गोंदावळे , महेश धुरी* यांनी केले आहे.

You cannot copy content of this page