मालवणात मनसेतर्फे दिवाळी देखावे व किल्ला बनविणे स्पर्धेचे आयोजन

⚡मालवण ता.१२-: दिवाळी सण उत्साहात साजरा होत असून मालवण शहरात दिवाळी व पाडवा निमित्ताने विविध देखावे व मातीचे किल्ले बनवले जातात. हे औचित्य साधून मनसे मालवण शहराच्या वतीने दिवाळी देखावा व किल्ला बनविणे स्पर्धेचे आयोजन मनसेचे माजी मालवण शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी आपण बनविलेल्या देखावा, किल्ला आदीचे फोटो ९३०९३२३१५५ या व्हाट्सअँप नंबरवर पाठवावेत. १० पेक्षा जास्त स्पर्धाकांची नोंदणी अनिवार्य असणार आहे. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक पारितोषिक देण्यात येणार आहेत, अशी माहिती विशाल ओटवणेकर यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page