कोकण रेल्वे हे मधु दंडवतेंचे अजोड कार्य…

अशोक करंबेळकर:मधु दंडवते यांचा स्मृतिदिन साजरा..

कणकवली 12 नोव्हेंबर (प्रतिनिधी)- कोकण रेल्वे हे मधू दंडवतेंचे अजोड कार्य आहे , अशक्यप्राय वाटणारी कोकण रेल्वे मधु दंडवते यांच्या अथक प्रयत्नामुळे कोकणवासीयांच्या सेवेत रुजू झाली , असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांनी केले .


कोकण रेल्वे हे कोकणवासीयांचे स्वप्न सत्यात उतरवणारे मधु दंडवते यांचा अठरावा स्मृतिदिन कणकवली रेल्वे स्थानक येथे भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला यावेळी करंबेळकर बोलत होते . नॅशनल रेल्वे मजदूर युनियन आणि आम्ही कणकवलीकर यांच्यावतीने कणकवली रेल्वे स्थानकावरील मधू दंडवते यांच्या तस्वीरीला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली .यावेळी जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांच्या समवेत पत्रकार विजय गांवकर , नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे विभागीय अध्यक्ष रमाकांत नाडकर्णी , प्रशांत तांबे , संजय खरीवले , ॲड. प्रकाश पावसकर , माजी नगरसेवक उमेश वाळके , संजय मालंडकर , संदीप सरंगले , सचिन सरंगले , भाई परब ,आबा सावंत , प्रशांत सावंत , दीपक सावंत, मनोज नारकर , किशोर तांबे ,सोमन हेमंत , रवी जाधव , संगीता नकाशे, किशोर सोगम, अजय कदम आदी मान्यवर तथा कर्मचारी आणि प्रवासी उपस्थित होते .

You cannot copy content of this page