भंडारी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी साकारले गड किल्ले

⚡मालवण ता.१२-: मालवण येथील भंडारी ए. सो. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रशालेतर्फे किल्ले बनविणे स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांचे गट तयार करून घेण्यात आलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध गड किल्ल्याच्या साकारलेल्या प्रतिकृती लक्षवेधी ठरल्या.

भंडारी प्राथमिक शाळेतर्फे गेली बारा वर्षे किल्ले बनविणे हा उपक्रम विद्यार्थ्यांनासाठी राबविण्यात येत आहे. या स्पर्धेतील प्रत्येक गटात ८ ते १० विद्यार्थी सहभागी झाले होते. कोणत्या किल्ल्याची प्रतिकृती तयार करायची हे प्रत्येक गटाने ठरवून त्यानुसार दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांनी किल्ले तयार केले. यामध्ये विद्यार्थ्यांनी सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, राजगड, सिंधुदुर्ग, तोरणा, प्रतापगड, विशाळगड, पन्हाळगड, इत्यादी किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या. सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत किल्ल्यांच्या सुंदर अशा प्रतिकृती तयार केल्या. यासाठी विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक भूपेश गोसावी, सहाय्यक शिक्षक राधा दिघे, पूर्वी गोवेकर, महेश लोकेगावकर यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. तसेच भंडारी एज्युकेशन सोसायटी च्या सर्व पदाधिकाऱ्यांचेही सहकार्य लाभले.

किल्ले बनविणे स्पर्धेतील विजेते गट पुढील प्रमाणे – प्रथम क्रमांक- (विभागून)- सुवर्णदुर्ग – स्पृहा भोवार व गट, पन्हाळा – ऋषिकेश पाटील व गट, द्वितीय क्रमांक – सिंधुदुर्ग – श्रेया शिंदे व गट, तृतीय क्रमांक- तोरणा – खुशी सावंत व गट, उत्तेजनार्थ- विजयदुर्ग – वैष्णवी आंबेरकर व गट, रायगड – साईश गोवेकर व गट.

You cannot copy content of this page