*💫मालवण दि.११-:* महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत तारकर्ली काळेथर यांच्यावतीने महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून १५० महिलांची यावेळी आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. कुमारी नार्वेकर, डॉ. सामंत आणि मालवण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कुबेर मिठारी यांनी या आरोग्य शिबिरात मार्गदर्शन करीत महिला वर्गाला आरोग्याच्या काळजी विषयी माहिती दिली. महिलांची ब्लडशुगर, हिमोग्लोबिन तसेच अन्य तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आला. यावेळी सरपंच सौ. स्नेहा केरकर, डॉ. जितेंद्र केरकर, सौ. ज्योती धुरत, सौ. हर्षदा वालावलकर, सौ. निशा टिकम, कु. वैभवी मुंबरकर, ज्ञानेश्वर शिरोडकर, आरोग्य सेविका सौ. काटकर, सौ. मराळ, आरोग्य सेवक श्री. ओटवणेकर, सौ. वेदा देऊलकर, रश्मीता तारी, गौरवी केळुसकर, विशाखा कुबल, सुप्रिया केरकर, संध्या वायगणकर, अस्मिता केळुसकर, दिव्यांका सावंत, विजया मेस्त्री, संध्या गोवेकर, स्नेहा कुबल, वंदना मयेकर तसेच इतर उपस्थित होते.
तारकर्ली ग्रा. पं. च्या आरोग्य शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद….
