निबंध स्पर्धेत उभादांडा इंग्लिश स्कूलचे यश

⚡वेंगुर्ला ता.०७-: भारतीय बौद्ध महासभेच्या सिधुदुर्ग शाखेच्यावतीने शालेय मुलांना व्यासपिठ देण्यासाठी ६७व्या धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधून घेतलेल्या ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठी योगदान‘ यावर घेतलेल्या निबंध स्पर्धेत उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलच्या वैभवी चिपकरने प्रथम व सोहम टेमकर याने द्वितीय तर ‘भारतीय संविधान मानव मुक्तीचा जाहिरनामा‘ यावरील निबंध स्पर्धेत गायत्री वरगांवकर हिने तृतीय क्रमांक पटकाविला.

  या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक लिपिक अजित केरकर व शिक्षक वैभव खानोलकर तसेच शालेय उपक्रमात सहकार्य करणारे दिलीप गोठसकर यांचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर, संस्था चेअरमन विरेंद्र कामत आडारकर, उपाध्यक्ष रमेश पिगुळकर, सचिव रमेश नरसुले, सदस्य निलेश मांजरेकर यांचे अभिनंदन केले.
You cannot copy content of this page