शिवसेनेतर्फे 11 नोव्हेंबर रोजी कणकवलीत नरकासुर स्पर्धा

⚡कणकवली ता.०३-: शिवसेना तालुका कणकवली व कणकवली शहर शिवसेना यांच्या वतीने नरकासुर स्पर्धा शनिवार दिनांक 11 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 7:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक कणकवली येथे आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी विजेत्या स्पर्धकांना भरघोस बक्षिसे ठेवण्यात आले आहेत. प्रथम पारितोषिक १०००० रुपये द्वितीय पारितोषिक ७००० रुपये तृतीय पारितोषिक ५००० रुपये आणि उत्तेजनार्थ बक्षीस दिले जाणार आहे. या स्पर्धेसाठी स्पर्धकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, कणकवली तालुकाप्रमुख भूषण परुळेकर आणि कणकवली शहरप्रमुख सत्यजित (बाळू ) पारकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page