गणेश कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य: मळगाव मनसे पदाधिकाऱ्यांचा पुढाकार..
⚡सावंतवाडी ता.०३-: महाराष्ट्र नवनिर्माण सेना लाॅटरी सेनेचे अध्यक्ष मा.श्री. गणेश कदम यांच्या वाढदिवसा निमीत्त मळगावमध्ये सोलर स्ट्रीक लाईट लोकापर्ण सुधिर राऊळ आणि राकेश परब यांचा पुढाकार सोलर स्ट्रीक लाईटच उदघाटन मनसे जिल्हा संघटक अॅड. अनिल केसरकर आणि राजू राऊळ, गौरेश राऊळ यांच्या हस्ते करण्यात आले.
दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त मळगाव ब्राम्हणआळी मध्ये सोलर लाईट देण्यात आली.
कार्यक्रमासाठी लाॅटरीसेनेचे तालुका अध्यक्ष राजेश मामलेकर यांनी फोन वरून दिल्या शुभेच्छा या सोलर लाईट मुळे तेथील ग्रामस्थांना चांगल्या पद्धतीने उपयोग होणार आहे ही घर जंगल पट्टयात असल्याकारणाने तेथून जाणारी जुनी पायवाट आणि बाजूला असणारी गणेश तळी आणि पाणी पिण्याची विहीर यासाठी तेथील ग्रामस्थांना चांगल्या पद्धतीने सोलर लाईटचा उपयोग होणार आहे आणि ही सोलर लाईट दिल्याबद्दल ग्रामस्थांनी मानले गणेश कदम आणि तेथील मनसैनिकांचे आभार त्यावेळी महाराष्ट्र सैनिक साहिल तळकटकर, ओमकार नवार, संदीप राऊळ, जय राऊळ, अर्जुन गावकर मकरंद राऊळ गजेंद्र राऊळ अनिल राऊळ अनिता राऊळ गजानन राऊळ सुहासिनी राऊळ राखी राऊळ इत्यादि उपस्थित होते.
