लाईनमन गायब असल्याने ग्रामस्थ आक्रमक : वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करण्याची मागणी…
⚡बांदा ता.०१-:
पाडलोस, आरोस, मडुरा, दांडेली, रोणापाल, न्हावेली-रेवटेवाडी भाग गेले दोन दिवस विजेअभावी अंधारात आहे. दोन दिवस होऊन फॉल्ट मिळत नसल्याने ग्रामस्थांनी सावंतवाडी उपअभियंता श्री. चव्हाण यांनाच धारेवर धरले. जोपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत न जाण्याचा इशाराच देत धारेवर धरले. लाईनमन नसल्यानेच वीज समस्या उद्भवते, पहिल्यांदा लाईनमनला उपस्थित करा असे सांगत अनेक वीज समस्यांची सरबत्ती केली. मात्र वीज ग्राहकांच्या प्रश्नांपुढे उपअभियंता निरुत्तर झाले.
पाडलोस, आरोस, दांडेली भागात दोन दिवस वीज नसल्याने पाहणी करण्यासाठी आलेल्या सावंतवाडी उपअभियंता श्री. चव्हाण यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. वीज वितरण शहर अधिकारी श्री.खोब्रागडे, बांदा सहाय्यक अभियंता एस. कोहळे, पाडलोस उपसरपंच राजू शेटकर, वीज ग्राहक गौरेश पटेकर, अमोल नाईक, अक्षय साळगावकर, अमित नाईक ,भूषण केणी, मनोज कुबल, अविनाश गावडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
