⚡ओरोस ता.०१-: सिंधुदुर्ग जिल्हा मुवथाई थाई बॉक्सिंग असोसिएशन सिंधुदुर्ग तर्फे घेण्यात आलेल्या कराटे बेल्ट परीक्षेत चौके, मालवण मधील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. ओरोस येथे ही परीक्षा पार पडली.
या परीक्षेमध्ये कु. लावण्या गेंड, कु.आर्या पाटकर, कु. सुमन चव्हाण, कु. सरीशा चव्हाण, कु.रिद्धी कांबळी, कु.लोकेश चव्हाण , कु. मयूर चव्हाण यांना येलो बेल्ट प्राप्त झाला.
कु. स्पृहा सावंत, कु. किमया चव्हाण, कु. गुंजन कारेकर, कु. पियूष रासाम व यांना ऑरेंज बेल्ट प्राप्त झाला.
कु. वेदा परुळेकर, कु. मृणाली कासार, कु. चैतन्य लोट, कु. रश्मी रासम, कु. श्रीकृष्ण भोई यांना ब्लू बेल्ट तर कु. सुरज काळे, कु. मीत मुळये व कु. पार्थ बालम यांना पर्पल बेल्ट प्राप्त झाला.
कु. आशय येजरे व यांना ग्रीन बेल्ट प्राप्त झाला. कु. नितेश गुप्ता याला ब्राऊन फर्स्ट बेल्ट प्राप्त झाला. खेळाडूंना कराटे प्रशिक्षक श्रीम. मृणाल मलये यांचे सर्व खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे मुख्य प्रशिक्षक सेंसोई लेफ्टनंट विवेक व्यंकटेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सदर परिक्षा पार पडली. यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे विश्वस्थ तसेच रोटरी क्लबचे सदस्य श्री. गौरव रामचंद्र घोगळे यांनी अभिनंदन केले.
कराटे बेल्ट परीक्षेत चौके, मालवण मधील खेळाडूंचे यश
