कोल्हापूर येथील भरारी पथकाची ओसरगाव येथे अवैध दारूवर कारवाई…

तब्बल १ कोटी 26 लाखांचा मुद्देमाल ताब्यात; साताऱ्यातील एक ताब्यात…

⚡बांदा ता.०१-: राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर भरारी पथकाची मुंबई गोवा महामार्गवर ओसरगाव येथे गोवा बनावटीची दारू वाहतुकीच्या ट्रकवर कारवाई करण्यात आली असून यात तब्बल एक 1,26.32,860 मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी साताऱ्यातील एकाला ताब्यात घेण्यात आले असून ही कारवाई आज सकाळी करण्यात आली आहे.

ही कारवाई आज राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी,संचालक सुनील चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, व्ही.पी.चिंचाळकर,विभागीय आयुक्त कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर निरीक्षकाच्या भरारी पथकाने ओसरगाव येथे आज सकाळी केली यावेळी भारतबॉन्झ कंपनीची १६चाकी गाडी पकडण्यात आली त्यात सरपणाच्या गोण्यांच्या आत मोठ्या प्रमाणात दारू साठा आणि बियर बॉक्स आढळून आले. याप्रकरणी वाहनचालक लक्ष्मण अर्जुन ढेकळे ,वय ३४ रा.बेघर वस्ती,पाडळी, सुपानी, ता.कराड, जिल्हा सातारा याना अटक करण्यात आली आहे.ही कारवाई निरीक्षक पंकज कुंभार,दुय्यम निरीक्षक आर.जी.येवलुजे,एस.एस.गोंदकर,कॉन्स्टेबल सुशांत बनसोडे,विलास पवार,अमोल यादव,योगेश शेलार,राहुल सकपाळ यांनी केली अधिक तपास दुय्यम निरीक्षक आर.जी.येवलुजे करीत आहेत.यावेळी 70,80,360 किमतीची दारू वाहन 55 लाख आणि इतर मुद्देमाल 52 हजार 500 रुपये असे मिळून 1कोटी 26 लाख 32 हजार 860 रूपये मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

You cannot copy content of this page