दानशूर व्यक्तिमत्त्वांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा-:सरपंच प्रणया टेमकर…

नाट्य निर्माता दिगंबर मुंबरकर यांच्या कडून केंद्र शाळा आचरे नं १ला साऊंड सिस्टीम प्रदान

*💫मालवण दि.११-:* आपल्या शाळे प्रती असलेल्या आत्मियतेमुळे मुंबईकर यांच्या सारखी व्यक्ती शाळेला मदत करत आहेत अशा दानशूर व्यक्तींमत्वांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घेण्याचे आवाहन आचरा सरपंच प्रणया टेमकर यांनी केद्र शाळा आचरे येथे केले. शाळेची गरज ओळखून नाट्य निर्माता दिगंबर मुंबरकर यांच्या कडून केंद्र शाळा आचरे नं १ला साउंड सिस्टीम प्रदान करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या या वेळी व्यासपीठावर नाट्य निर्माते दिगंबर मुंबरकर, पंचायत समिती सदस्या निधी मुणगेकर केंद्र प्रमुख सुगंधी गुरव, मुख्याध्यापिका श्रीमती जोशी,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितीन घाडी, मालवण तालुका पत्रकार समिती उपाध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, शिक्षक पांडूरंग कोचरेकर, चंद्रकांत माने,संजय जाधव, जेष्ठ नागरिक लक्ष्मण आचरेकर यांच्या सह अन्य पालक विद्यार्थी आदी उपस्थित होते. या वेळी मालवण तालुका पत्रकार समिती उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झालेल्या पत्रकार अर्जुन बापर्डेकर यांचा दिगंबर मुंबरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

You cannot copy content of this page