बेळगाव येथे वितरण: सर्वत्र पांचाळ यांचे होत आहे कौतुक
⚡सावंतवाडी ता.३१-: समाज सेवा कामाची दखल घेऊन दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या राज्यातून निवड करण्यात आलेल्या महेश पांचाळ यांचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. इंटिग्रेटेड सोशल सोसायटी बेळगावी या संस्थेच्या माध्यमातून महेश पांचाळ यांना हा आदर्श समाज सेवक पुरस्कार देण्यात आला आहे.
