सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर यांची मागणी..
⚡कणकवली ता.३०-: कणकवली येथील विहीरींचे पाणी झपाट्याने कमी होते आहे.त्या करिता आता मागील वर्षी सारखी परिस्थिती येऊ नये, म्हणून येत्या महिनाभरातच गड नदीला असणाऱ्या बंधाऱ्याला पाणी अडवण्यासाठीच्या प्लेट बसविण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी एका निवेदनाद्वारे कणकवली तहसीलदार दिशांत देशपांडे यांच्याकडे केली आहे.
जानवली नदीच्या पात्रात सुध्दा जो माती, दगड रचून पावसाळा संपल्यानंतर बंधारा केला जातो, तोही होणे आवश्यक आहे.अन्यथा कणकवली करांवर पाण्यासाठी मागील वर्षा सारखी वणवण फिरण्याची वेळ येऊ शकते, आणि म्हणूनच संबंधित प्रशासनाला आमची विनंती आहे.काही अडचणी असतील तर, आम्ही सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते हे करायला तयार आहोत .तरी हे येत्या महिनाभरात हे होणे आवश्यक आहे.संबंधित प्रशासनाने याची वेळीच दखल घ्यावी आणि आम्ही कणककलीकरांवर येणारे पाण्याचे संकट निवारण करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी केली आहे.
