निगुडे सोनुर्ली रस्त्यावर भरधाव ववाहतूक करणाऱ्या डंपरने बकऱ्यांच्या कळपाला दिली धडक…

एका बकरीचा जागीच मृत्यू: शेतकऱ्याचे 15 हजारचे नुकसान..

⚡बांदा ता.२८-: निगुडे सोनुर्ली रस्त्यावर निगुडे येथे भरधाव वेगात खनिज वाहतूक करणाऱ्या डंपरने शेतकरी पांडुरंग बाळा गावडे यांच्या बकऱ्यांच्या कळपाला धडक दिली. या धडकेत एका बकरीचा जागीच मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले.
निगुडे पोलीस पाटील सुचिता मयेकर, ग्रामपंचायत सदस्य समीर गावडे, महेश गावडे यांनी पंचनामा केला. मे महिन्यात एक कोटी रुपये खर्च करून रस्ता सुस्थितीत करण्यात आला. यासाठी अनेकवेळा स्थानिकांनी आंदोलन केले होते.
या अवैध वाहतुकीमुळे सदर रस्त्यावरून दुचाकीने वाहतूक करणे देखील अवघड झाले आहे. शाळेतील विद्यार्थी या रस्त्यावरून नेहमी चालत ये-जा करत असतात. लहान मुलांच्या शाळेच्या बसेस याचं रस्त्यावरून जातात. परंतु गेले सहा सात महिने यासंदर्भात या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक होते. रस्ता अरुंद असल्यामुळे अनेक लोकांना याचा त्रास सहन करावा लागतो.
उपप्रादेशिक परिवहन, महसूल विभाग आणि जिल्हा खनिकर्म यांच्या आशीर्वादाने सदर वाहतूक होत असल्याचा आरोप माजी उपसरपंच गुरूदास गवंडे यांनी केला आहे. आज या ठिकाणी अपघातात एका पाळीव प्राण्याचा बळी गेला, भविष्यात या ठिकाणी जर जीवितहानी झाल्यास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील यासंदर्भात योग्य ते दखल घेऊन ज्या खाणींवरून ही वाहतूक होते त्या खाणींचे परवाने कायमस्वरूपी रद्द करा अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशाराही निगुडे ग्रामस्थांनी दिला आहे.

You cannot copy content of this page