भाजप नेते निलेश राणे यांनी केली पाहणी:१ नोव्हेंबर रोजी पालकमंत्री करणार पाहणी
मालवण दि प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ४ डिसेंबर रोजी होणाऱ्या नौदल दिनानिमित्त मालवण शहरातील राजकोट येथे भव्य असा शिवपुतळा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या कामाची माजी खासदार निलेश राणे यांनी पाहणी करून हे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकारी आणि ठेकेदारासोबत यावेळी चर्चा करण्यात आली. तर येत्या १ नोव्हेंबर रोजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे याठिकाणी पाहणी करणार आहेत असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, संदीप परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक गणेश कुशे, आप्पा लुडबे, अवी सामंत, बाबा मोंडकर ,आबा हडकर यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
