आंबोली घाटकरवाडी येथील दुर्दैवी घटना: सोंडेने उचलून आपटत घेतले पायदळी
आंबोली, ता.२८: आंबोली घाटकर वाडी परिसरात स्थिरावलेल्या हत्तीच्या हल्ल्यात घाटकरवाडी येथील वन कर्मचारी प्रकाश गोविंद पाटील वय 54 याना हत्तीने सोंडेने उचलून आपटल्याने आणि पाय दिल्याने जागीच मृत्यू झाला.ही घटना आज सकाळी घाटकर वाडी(ता.आजरा) येथे ग्रामस्थांसोबत हत्ती हुसकवताना घडली.हा टस्कर हत्ती गेली काही वर्षे आंबोली हद्दीवर स्थिरावला आहे.तो आक्रमक झाला आहे.आज घटनेने वनविभागाला आता गंभीरपणे याकडे बघण्याची आवश्यकता आहे.
