मराठा बांधवांनी संयम ठेवावा,…

आम.नितेश राणे:पिढ्यानपिढ्या टिकणारे आरक्षण देणार..

कणकवली 28 ऑक्टोंबर (प्रतिनिधी)-मराठा आरक्षण मिळणारच असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल आहे. कोणताही मराठा छत्रपतींची खोटी शपथ घेणार नाही. थोडा संयम ठेवा पिढ्यानपिढ्या टिकणार आरक्षण मराठा समाजाला शिंदे,फडणवीस, अजिदादा यांचे असलेले आपल्या सर्वांचे देईल असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी दिला.

कोणी आपल्या समाज बांधवांच्या विरोधात बोलण्यापेक्षा समाज म्हणून एकत्र यावे .राणे साहेबांनी आपल्या संशोधनातून सांगितले होते, मराठा कुणबी एक आहेत मात्र ज्यांना जे हवे ते प्रमाणपत्र घ्याव त्यासाठी त्यांनी विरोध केला नाही.तर यशोमती ठाकूर ह्या भाजप मध्ये केव्हा येण्याच्या तयारीत होत्या हे सांगितलं तर त्यांना लाज वाटेल.असेही सुनावले

ह्यापूर्वी काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांचा विचार कधीच केला नाही.आज जेवढ्या योजना मोदी सरकारने आणल्या आहेत.त्याचा आढावा घ्या. 2000 रुपया प्रमाणे वर्षाला 6000 रुपयांचे अनुदान शेकऱ्यांच्या खात्यात मोदी सरकार देत आहे त्याची सुद्धा चर्चा करा. शेती प्रधान असलेला आपला देश 2030 ला तिसऱ्या क्रमांकावर असेल.असा त्यांचा संकल्प आहे.आम्ही केलेल्या विकासकामांची खुल्या व्यासपीठावर चर्चा होउदे. संजय राऊत येऊंदे पवारांचा पट्टा गळ्यात घालून मग उद्धव ठाकरे असताना सुद्धा महाराष्ट्रात कशा पद्धतीने वाट लावली याचा हिशोब करू असे आव्हान आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांना दिले.

You cannot copy content of this page