विनायक भिडे:मंदिरातील सुशोभिकरणात सहभागी महिला व इतर व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार..
⚡मालवण ता.२७-: भैरवी मंदिर बाळगोपाळ मित्रमंडळाने सलग दहा दिवस भजन महोत्सव आयोजित करून युवा पिढीला एक दिशा देण्याचे काम केले आहे. भजन महोत्सवातून ईश्वराचे आराधना होण्याबरोबरच भक्तांना ईश्वराचे नामस्मरण करण्याचीही संधी उपलब्ध होत असते. आजच्या धकाधकीच्या जीवनात काही काळ परमेश्वराच्या सानिध्यात घालविण्यासाठी भजनात दंग होणे क्रमप्राप्त आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध भजनीबुवा विनायक भिडे यांनी केले.
मालवण येथील भैरवी मंदिरातील भजन महोत्सवाचा शानदार समारोपप्रसंगी भिडे यांनी आपली सेवा बजावली. यावेळी विजय शिवा चव्हाण, आनंद आचरेकर, मंडळाचे अध्यक्ष अंकुश चव्हाण, उदय चव्हाण, राहुल चव्हाण, रोहन चव्हाण, दीपक चव्हाण, उत्तम चव्हाण, हेमंत चव्हाण, ललीत चव्हाण, देवेंद्र चव्हाण, अॅड. पलाश चव्हाण, सिद्धेश चव्हाण, किशोर चव्हाण, राजू चव्हाण, दिलीप वायंगणकर, सुनील वायंगणकर, सदा चुरी, रामकृष्ण चव्हाण, राजन सकपाळ, बबन सकपाळ, उद्देश चव्हाण, जगदिश वालावलकर, लवू चव्हाण, कौशल्य वस्त, संजय चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभार अॅड. पलाश चव्हाण यांनी मानले.
प्रास्ताविक करताना अॅड पलाश चव्हाण यांनी भजन महोत्सवात सहभागी झालेले बुवा समीर कदम, मंगेश नलावडे, चेतन धुरी या डबलबारीतील भजनीबुवांनी मंडळाच्या उपक्रमांना दिलेल्या शुभेच्छांचा मागोवा घेत आयोजित विविध कार्यक्रमांची माहिती दिली. मंडळाने आजपर्यंत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम घेतले असून यातून सांस्कृतिक आणि सामाजिकतेची जाणीव करण्यात आल्याचे दिसून आल्याचे स्पष्ट केले. यावेळी मंदिरातील सुशोभिकरणात सहभागी महिला व इतर व्यक्तींचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
वयाच्या चार ते पंधरा वर्षांच्या आतील असलेल्या बालकलाकारांनी यावेळी मंदिरात सादर केलेल्या भजन सेवेला रसिकांनी भरभरून दाद दिली. यातील सर्वच बाल कलाकार लिलयापणे पेटी वाजवित होते. बाल कलाकारांनी उत्स्फूर्तपणे सादर केलेल्या सर्वच संगीत भजनातून भजन महोत्सव एका मोठ्या उंचीवर पोहचला होता. यामुळे भिरखंडे येथील बाल कलाकार असलेल्या दिर्बारामेश्वर भजन मंडळाच्या दिव्या नंदकिशोर चव्हाण, दिव्या गावकर, श्रेयस गावकर, आर्या सावंत, प्राप्ती सावंत, सेजल शिवडावकर, पखवाजसाथ देणारे गणेश पारकर मार्गदर्शक भजनीबुवा सतीश सावंत, नंदकिशोर चव्हाण या सर्वांचा मंडळाच्यावतीने खास सत्कार करण्यात आला.
