84 लाख 90 हजार 120 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात:राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने ओरस येथे कारवाई…
⚡बांदा ता.२०-: गोव्याहून मुंबईच्या दिशेने बेकायदेशीर दारू वाहतुक करणाऱ्या मालवाहू टेम्पोवर राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने ओरस रवळनाथ मंदिर येथे कारवाई केली. या कारवाईत तब्बल 900 बॉक्स जप्त करण्यात आले. या कारवाईत 64 लाख 80 हजार किमतीची दारू व 20 लाख किंमतीचा टेम्पो असा एकूण 84 लाख 90 हजार 120 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. तर याप्रकरणी मयुर भगवान चव्हाण (33रा केडगाव , पुणे) व दिलीप झुंबर चव्हाण ( 38, रा वरवंड, पुणे) याना ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई अधीक्षक वैभव वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शरद जाधव, पथकप्रमुख सत्यवान भगत, दुय्यम निरीक्षक विशाल सरवटे, जगन चव्हाण यांनी केली अधिक तपास पथकप्रमुख सत्यवान भगत करीत आहेत.
