⚡कणकवली ता.१९-: अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर,जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष दादा कुडतरकर आणि संजय मालंडकर, नगरपंचायत निवृत्त कर्मचारी सुभाष उबाळे यांच्या हस्ते सौ. शितल रामदास मांजरेकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले
तसेच या प्रसंगी १५ दिवसा पूर्वी वॉटर सप्लाय मुंबई विभागातून निवृत्त झालेले कर्मचारी सदानंद पारकर यांचा ही सत्कार करण्यात आला,
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना , मानव साधन विकास संस्था संचलित “जनशिक्षण संस्थान, सहायक सौंदर्य चिकिस्तक प्रशिक्षण अशा एक ना अनेक संस्थामध्ये आपले स्वतः चे ब्युटी पार्लर आणि आपल्या पतिदेवांच्या हॉटेल मध्ये सहभागी होऊन, तसेच गृहिणीची सर्व कामे करणाऱ्या नवदुर्गेचा सन्मान करताना मला अतिशय आनंद होत आहे, असे मनोगत अशोक करंबेळकर यांनी व्यक्त केले
दादा कुडतरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी किशन राजेंद्र पेडणेकर याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अप्पासाहेब पटवर्धन चौकात सर्वांना जिलेबी वाटप करण्यात आले.या प्रसंगी सईद नाईक, बाबुराव घाडीगावकर, प्रसाद पाताडे, चंद्रकांत चव्हाण, देवराज जाधव आणि पेडणेकर यांचा सर्व मित्र परिवार उपस्थित होता.
आम्ही कणकवलीकर व राजेंद्र पेडणेकर मित्रमंडळातर्फे महिलांचा सन्मान…
