⚡बांदा ता.१९-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व सिंधुदूर्ग जिल्हा क्रीडा परिषद आयोजित जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत विदया विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची विदयार्थीनी वंदना श्रीकांत कोकरे (इयत्ता नववी) हिने सतरा वर्षे वयोगटातून 3000 मीटर धावणे क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तिची सांगली येथे होणाऱ्या विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली. तसेच मयुरी महेश आरोसकर इयत्ता दहावी हिने 1500 मीटर धावणेमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला.
19 वर्षे वयोगटातून यज्ञिका गुरूनाथ पटेकर (इयत्ता बारावी) हिने 3000 मीटर धावणे क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक प्राप्त केला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष निलेश परब, सचिव शांताराम गावडे, शालेय समिती अध्यक्ष हेमंत कामत, सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक सदाशिव धुपकर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना निलेश देऊलकर यांचे मार्गदर्शन लाभले.
