कणकवली येथे २० रोजी दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिर

⚡कणकवली ता.१७-:
दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिर उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे शुक्रवार २० ऑक्टोंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आले आहे. एकता दिव्यांग विकास संस्थेच्या मागणीला यश आले असून पाठपुरावा यशस्वी ठरला आहे.

एकता दिव्यांग विकास संस्थेने संस्थेने दिव्यांगाच्या विविध मागण्यासाठी १५ ऑगस्टला तहसीलदार व प्रांताधिकारी यांना उपोषण करणार असल्याचे निवेदन दिले होते. कणकवली तहसीलदार श्री.देशपांडे व प्रांताधिकारी श्री .कातकर यांनी उपोषण न करता समस्या सोडवु असे आश्वासन दिले होते .त्यातील काही मागण्या मान्य केल्या व काही प्रशासकीय पातळीवर करून घेतो असे सांगितले होते . दिव्यांग प्रमाणपत्र कार्ड ऑनलाईन करणे, रेल्वे पाससाठी सावंतवाडी किवावरत्नागिरीला जावे लागत होते. ते आता कणकवली येथे होणार आहे. व अंत्योदयचा लाभ देणार आहेत यावेळी संस्था अध्यक्ष सुनील सावंत, उपाध्यक्ष संजय वारंंगे, सचिव सचिन सादये, दिव्यांग बांधव आणि भगीनी उपस्थित होते.

You cannot copy content of this page