अबिद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम…

⚡कणकवली ता.१७-:
राष्ट्रवादीचे सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार 18 ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात कणकवली शहरातील शाळा क्रमांक 5 मधील 65 मुलांना ब्लँकेट वाटप करण्यात येणार आहे. तसेच या मुलांना जेवण व खाऊ वाटपही करण्यात येणार आहे. तर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात येणार आहे.
वाढदिवसानिमित्तच्या सामाजिक उपक्रमामध्ये असलदे दिविजा वृद्धाश्रमासाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. तर दुपारी कणकवली पटवर्धन चौक येथे कणकवलीची थाळीचे दोनशे जणांना वाटप करण्यात येणार आहे.
तर सायंकाळी ७.३० वाजता अबिद नाईक यांच्या निवासस्थानी अभिष्टचिंतन सोहळा होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page