मालवण पंचायत समितीच्या अमृत कलश यात्रेस प्रतिसाद

⚡मालवण ता.१६-: आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत ‘मेरी ‘मिठ्ठी मेरा देश’ अमृत कलश यात्रा आज मालवण पंचायत समिती कार्यालयाकडून देशाप्रती विविध घोषणा देत काढण्यात आली. यावेळी विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला.

माझी माती माझा देश उपक्रमांतर्गत मालवण पंचायत समितीतर्फे मालवणऻत तालुकास्तरीय अमृत कलश यात्रा आयोजित केली होती. या कार्यक्रमाचे उद्घाटन गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर, सहाय्यक गटविकास अधिकारी शाम चव्हाण गटशिक्षणाधिकारी संजय माने, नेहरू युवा केंद्र मालवण तालुका समन्वयक ऐश्वर्य मांजरेकर, आरोग्य विस्तार अधिकारी सूरज बांगर, सांख्यिकी विभाग विस्तार अधिकारी श्रीकृष्ण सावंत, बालविकास प्रकल्प अधिकारी कुमुदिनी रसाळ, पंचायत समितीचे सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, तालुक्यातील सर्व ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, बचत गटाच्या महिला, शालेय विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शिक्षक वृंद तथा पं. स.चे सर्व अधिकारी व कर्मचारी यांना पंचप्राण शपथ देण्यात आली. उपस्थित कलाकारांनी देशभक्तीपर गीते सादर केली. मालवण शहर व मालवण तालुक्यांतील ग्रामपंचायत मधील माती पंचायत समितीकडे एकत्र करण्यात आली. ती माती अमृत कलशात एकत्रित करून अमृत कलश यात्रेला सुरुवात करण्यात आली. गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर, सहायक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्या उपस्थितीत रॅली काढून मालवण पंचायत समिती कार्यालयासमोर स्वागत करण्यात आले. गटविकास अधिकारी श्री. गुजर यांनी पंचायत समितीच्या वतीने नेहरू युवा केंद्राचे मालवण तालुका समन्वयक ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर यांच्याकडे अमृत कलश सुपूर्द केला. मालवण शहर व मालवण तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींचा अमृत कलश दिल्ली येथे होणाऱ्या अमृत वाटिका मध्ये नेण्यासाठी व मालवण तालुक्याचे प्रतिनिधित्व दिल्ली मध्ये करण्याची संधी केंद्र सरकार द्वारे ऐश्वर्य मांजरेकर व भाग्यश्री मांजरेकर यांना प्राप्त झाली असुन विशेष रेल्वेने राज्याकडून ती दिल्ली येथे पाठविण्यात येणार आहे. दिल्ली येथे या मातीचा वापर शूरवीरांच्या स्मरणार्थ अमृत वाटिकेच्या निर्मितीमध्ये केला जाणार आहे.

You cannot copy content of this page