⚡कणकवली ता.१५-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरिय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत
14 वर्षाखालील मुलगे- गणेश घाडी, तनिष्क वारीक, रामचंद्र पाटील, ललित सोनी, श्रेयस पाटील आणि 17 वर्षाखालील मुलगे- ओंकार ठाकूर, तन्मय शेळके, मयुरेश चव्हाण, मोहित कांबळे, साहिल गोसावी या दोन्ही गटातल्या खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेत वर्चस्व प्राप्त केले आहे.
दोन्हीही संघाची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक श्री. अच्युतराव वनवे व श्री. सुदिन पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. संस्थेच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सचिव विजयकुमार वळंजू, अध्यक्ष दत्तात्रय तवटे, ट्रस्टी अनिलपंत डेगवेकर , मुख्याध्यापक. पी.जे.कांबळे,पर्यवेक्षिका सौ.जाधव व्ही.बी. व सर्व शिक्षक- शिक्षकेत्तर वर्गानी अभिनंदन केले आहे.
