दांडिया स्पर्धेतून नवरात्रौत्सवातील नऊ देवीना आमंत्रण…

सौ. वेदिका परब; युवक युवतीच्या कला गुणांना वाव मिळण्याचा प्रयत्न..

⚡वेगुर्ले ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात भजन किर्तन अशा स्पर्धा होतच असतात मात्र इथल्या तरुण तरुणांसाठी त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा दांडिया स्पर्धेतून प्रयत्न आहे. खरतर विशाल परब यांचा वाढदिवस पंधरा ऑक्टोबरला होत आहे पण आजच्या दांडियांच्या नृत्याने पुढील नवरात्रोत्सवातील नऊ दिवसांच्या नऊ देवींना आजच आमंत्रित केले आहे.

दुर्गा मातेने विशाल परब यांना उत्तम आयुष्य ऐश्वर्य लाभो तसेच तमान जनतेला सुखी आणि चांगले आरोग्य देवो अशी हाक दांडिया स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सौ.वेदिका परब यांनी मारली.
यावेळी व्यासपीठावर भाजपा नेते युवा उद्योजक विशाल परब,भाजपा तालुकाध्यक्ष बाळू देसाई, प्रभाकर परब, जिल्हा बँक संचालक प्रकाश मौर्य, भाजपा प्रदेश कार्यालय चिटणीस शरद चव्हाण, वंसत तांडेल, बंड्या सावंत, दादा साईल, विनायक राणे, विकास परब, श्रीपाद तवटे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page