वेगुर्ल्याबद्दल मला नेहमीच आदर;कधीही हाक द्या सहकार्य राहील…

विशाल परब ; माझ्या कार्यक्रमांना वेगुर्लेकरांची नेहमीच साथ..

वेगुर्ले-:वेगुर्ला बद्दल मला नेहमीच आदर आहे कारण मी जे कार्यक्रम घेतो त्यांना प्रतिसाद देणारी जनता ही वेंगुर्ल्यातील जास्त असते. यापुढे वेंगुर्ल्यासाठी विशाल परब यांना केव्हाही हाक द्या माझे नेहमीच सहकार्य राहील. तर येणार्या काळात वेंगुर्ल्याचा कायापालट होणे गरजेचे आहे. यासाठी भाजपाचे नेते नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे. येथील तरुणांना आपल्या तालुक्यात रोजगार मिळावा यासाठी आमची धडपड आहे. आणि लवकर त्यात आम्हाला यश येईल यासाठी वेंगुर्लावाशियांची साथ पाहीजे असे आवाहनही त्यांनी केले. ते वेंगुर्ले येथील विशाल दांडिया स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सौ.वेदिका परब, भाजपा तालुकाध्यक्ष बाळू देसाई, प्रभाकर परब, जिल्हा बँक संचालक प्रकाश मौर्य, भाजपा प्रदेश कार्यालय चिटणीस शरद चव्हाण, वंसत तांडेल, बंड्या सावंत, दादा साईल, विनायक राणे, विकास परब आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page