⚡मालवण ता.१३-: भाजपा मच्छीमार सेल सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक पदी मच्छिमार नेते रविकिरण तोरसकर यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली आहे दरम्यान, या नियुक्ती नंतर बोलताना श्री तोरसकर यांनी मत्स्य व्यवसायवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र अंमलबजणी कक्ष स्थापन करणे आणि पंतप्रधान मत्स्य संपदा योजना अंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळवुन देणे तसेच मच्छीमार महिला सक्षमीकरण ही प्रमुख उदीष्ट डोळ्यासमोर ठेऊन भाजप मच्छिमार सेल कार्यरत राहणार असल्याचे सांगितले.
सिंधुदुर्गातील तीन सागरी तालुके, त्याचबरोबर जिल्ह्यातील खाडी व नदी क्षेत्रातील मच्छीमार आणि मत्स्यव्यवसाईक यांच्यासाठी भाजपा मच्छीमार सेल कार्यरत आहे. मत्स्य व्यवसायाला परप्रांतीय अनधिकृत मासेमारी, डिझेल कोटा,एनसीडीसी थकित कर्जे, सुसज्ज बंदरे नसणे, सरकारी योजना मधील त्रुटी, अपुऱ्या नागरी सोयी सुविधा अश्या अनेक विविध समस्या भेडसावत आहेत. भाजपा मच्छीमार सेलच्या माध्यमातून सदर समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे रविकिरण तोरसकर यांनी म्हटले आहे. तसेच जिल्ह्यात नव्याने उभारी घेणाऱ्या मत्स्यपालन क्षेत्राला उभारी देण्यासाठी पालकमंत्री आणि स्वतः मस्त्य शेतकरी असलेले ना. रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर मच्छीमार पट्ट्यामध्ये भाजपा संघटना वाढीसाठी विशेष प्रयत्न करणार आहोत, असेही रविकिरण तोरसकर यांनी म्हटले आहे.
भाजपा मच्छीमार सेल सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक पदी नियुक्ती केल्याबद्दल भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली,भाजपा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचे रविकिरण तोरसकर यांनी आभार मानले आहेत.
