सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी…

सूरज पाटील यांच्यावर अटकेची टांगती तलवार

⚡ओरोस ता.१३-: 1 लाखाची लाच स्वीकारल्याच्या गुन्ह्यात सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांना सोमवार पर्यंत 3 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी एस.डी. चव्हाण यांनी पोलीस कोठडी सुनावली आहे.

या गुन्ह्यातील अन्य आरोपी असलेले पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील यांना अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे प्रकृती अस्वास्थ्यामुळे जिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचार घेत असलेल्या उपनिरीक्षक सूरज पाटील यांच्यावर सुद्धा अटकेची टांगती तलवार आहे.

You cannot copy content of this page