Headlines

समाजाच्या जडणघाडणीत ज्येष्ठाचे योगदान खुप मोठे…

नकुल पार्सेकर: ग्रामपंचायत सभागृहात ज्येष्ठ नागरिक मेळावा संपन्न…

⚡बांदा ता.१३-: समाजाच्या जडणघाडणीत ज्येष्ठाचे योगदान हे खुप मोठे आहे. समाजाच्या, देशाच्या विकासासाठी ज्येष्ठानी सातत्याने मार्गदर्शकच्या भूमिकेत राहावे असे प्रतिपादन अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नकुल पार्सेकर यांनी येथे केले.

ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून येथील ग्रामपंचायत सभागृहात ज्येष्ठ नागरिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. पार्सेकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बांदा रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रमोद कामत, भाजपच्या सिंधुदुर्ग महिला मोर्चा अध्यक्षा श्वेता कोरगावकर, सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष अन्वर खान, उपाध्यक्ष हनुमंत सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी वयाची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण केलेले सभासद विजय मंगेश सुभेदार, अशोक गोविंद भोगले, दत्ताराम सीताराम गवस, रामकृष्ण वामन पेळपकर, सुमित्रा जयंत नाडकर्णी, मीना किसन दळवी, नीता सोमा वराडकर, नारायण अच्युत गोरे, हरिश्चंद्र रामा तोरसकर, स्वाती विठ्ठल पराष्ठेकर, गुरूनाथ श्रीधर मोर्ये, सुकाजी गोपाळ गावडे, अर्जुन गंगाराम रेडकर, रेवती रामचंद्र देसाई, शैलजा शंकर महाजन, मुकुंद सखाराम आमडोसकर यांच्यासह विविध क्षेत्रात योगदान दिलेले ‘सकाळ’चे प्रतिनिधी निलेश मोरजकर, प्रवीण परब, राकेश परब, मयुर चराटकर, मंगल कामत, नितेश परीट, प्रभाकर शिरसाट, श्वेता गावडे, तन्वी बांदेकर, ऐश्वर्या पेंडसे यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. प्रमुख अतिथी नकुल पार्सेकर, प्रमोद कामत, प्रियांका नाईक, जावेद खतिब यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी मान्यवरानी मनोगते व्यक्त केलीत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सचिव गुरूनाथ नार्वेकर यांनी केले. स्वागत व आभारप्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष अन्वर खान यांनी केले.

You cannot copy content of this page