रायगड लाच लुचपत विभागाची धाड ; अन्य काही अधिकारी व कर्मचारी रडारवर
सावंतवाडी
फसवणुकीच्या गुन्हात लाच घेतल्या प्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरिक्षकाला रायगड येथील लाच लुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई आज सायंकाळी करण्यात आली. याबाबतची तक्रार बिल्डर सिद्धांत परब यांनी केली होती. दरम्यान याबाबत पोलिस ठाण्यात अधिक चौकशी सुरु असून अजून काही कर्मचारी व अधिकारी रडारवर असल्याचे पुढे येत आहे
