⚡कणकवली ता.१२-: सिंधू रत्न योजना समितीचे सदस्य, तथा सुप्रसिद्ध उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत हे शुक्रवार 13 ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर दौऱ्यावर येत आहेत .या निमित्ताने ते कणकवली व कुडाळ विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी आगामी निवडणुकीबाबत संवाद साधणार आहेत .
आगामी काळात होत असलेल्या असलेल्या निवडणुकीच्या दृष्टीने किरण सामंत यांचा हा महत्त्वाचा दौरा असून उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत हे शुक्रवार 13 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10 वाजता शिवसेना मध्यवर्ती कार्यालय कणकवली येथे कणकवली व कुडाळ विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांबरोबर निवडणुकी संदर्भात चर्चा करणार असून मार्गदर्शन करणार आहेत .त्यानंतर दुपारी 2 वाजता ओरोस येथे होणाऱ्या सिंधू रत्न योजना समिती सभेस उपस्थित राहणार आहेत.
कार्यकर्त्यांनी कणकवली येथे उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रशेखर राणे यांनी केले आहे.
सिंधू रत्न योजना समितीचे सदस्य
किरण सामंत कार्यकर्त्यांशी साधणार संवाद
