जिमखाना मैदानावर जय्यत तयारी सुरु ; खासगी सुरक्षा व कडक पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात येणार..
सावंतवाडी
युवा उद्योजक भाजप नेते विशाल परब यांच्या वाढदिनी कार्यक्रमाच्या सांगता सोहळ्यानिमित्त जिमखाना मैदानावर जुबीन नौटीयाल यांचा कार्यक्रम होत असून ची जोरदार तयारी सुरू आहे या कार्यक्रमाच्या नियोजनाची पाहणी आज विशाल परब यांच्यासह भाजप उपाध्यक्ष संजू परब व सहकाऱ्यांकडून करण्यात आली. दरम्यान कार्यक्रमासाठी होणारी गर्दी लक्षात घेता कडेकोट पोलीस बंदोबस्त तसेच खासगी सुरक्षा संपुर्ण कार्यक्रम स्थळी ठेवण्यात येणार आहे.
