मालवण भरड येथील श्री दत्त मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने कीर्तन महोत्सवाचे आयोजन…

मालवण दि प्रतिनिधी
मालवण भरड येथील श्री दत्त मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने २४ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर या कालावधीत कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे

यात २४ ऑक्टोबर रोजी राजमाता जिजाऊ या विषयावर पुणे येथील मानसी बडवे, २५ ऑक्टोबर रोजी शिवस्नुषा महाराणी ताराऊ या विषयावर पुणे येथील अंजली कऱ्हाडकर, २६ ऑक्टोबर रोजी प्रतापगडचे युद्ध या विषयावर मालवण येथील हरिहर नातू २७ ऑक्टोबर रोजी बाजीप्रभू देशपांडे या विषयावर आंजर्ले दापोली येथील निहाल खांबेटे, २८ ऑक्टोबर रोजी तानाजी मालुसरे या विषयावर माजलगाव येथील लक्ष्मीप्रसाद पटवारी हे कीर्तन सादर करणार आहेत. तरी किर्तन प्रेमींनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्त मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ भरड मालवण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page