ग्रामस्थानी बुजविले श्रमदानाने रस्त्यातील खड्डे…!

*💫मालवण दि.०९-:* वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाच्या अशा मिठबाव दहीबाव रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहतुक धोकादायक बनली आहे. या मार्गावर नियमीत छोटेमोठे अपघात होत असतात. त्यामुळे मिठबाव येथील ग्रामस्थानी श्रमदानाने हे खड्डे बुजविले. यावेळी शैलेश मयेकर, कमलेश सावंत, पंकज मोंडकर, रघुनाथ आर्लेकर, संदिप बिर्जे हे युवक सहभागी झाले होते. सरकारी मदतीची अपेक्षा न ठेवता केवळ सामाजीक भान जपत या युवकानी बजावलेल्या कामगीरी बद्दल वाहन चालक व ग्रामस्थांमधुन कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page