_सावंतवाडी शिरोडा नाका येथील पंचायत समिती इमारतीला ग्राम विकास मंत्रालयाची प्रशासकीय मान्यता…_*

⚡सावंतवाडी ता.१०-: सावंतवाडी पंचायत समितीच्या शिरोडा नाका येथील नियोजित इमारतीला ग्राम विकास मंत्रालयाने प्रशासकीय मान्यता दिली आहे वारे 14 कोटी 60 लाख रुपयांच्या खर्चाला ही मान्यता देण्यात आली आहे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी मान्यता दिली.

असून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता हे इमारत गेली आठ वर्षे रखडली होती जागेच्या मुद्द्यावरून ही इमारत कुठे व्हावी असा प्रश्न निर्माण झाला होता मात्र दीपक केसरकर यांनी शिरोडा नाका येथील जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या जागेत ही इमारत उभारण्याचा निर्णय घेतला त्यानुसार आराखडा बनवून प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात आला होता त्याला मंजुरी मिळाली आहे यापूर्वी सालाई वाडा येथील जुन्या जागेचा दोन कोटी पन्नास लाख रुपयांचा आराखडा पाठवण्यात आला होता परंतु ती जागा अपुरी होती त्यामुळे या नव्या जागेला मान्यता देण्यात आली आहे

You cannot copy content of this page