⚡सिंधुदुर्ग ता.०९-: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार डॉ.निलेश राणे यांनी आज पत्रकार आबा खवणेकर यांच्या केळुस कालवीबंदर येथील निवासस्थानी २१ दिवसांसाठी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे आज सोमवारी दर्शन व आशीर्वाद घेतला.यावेळी पत्रकार आबा खवणेकर यांचे वडील नारायण खवणेकर यांनी डाॅ निलेश राणे साहेबांचे श्रीफळ देऊन स्वागत केले.
यावेळी केळुस कालवीबंदर वाडीतील ग्रामस्थ बाबुराव ताम्हणकर,पांडुरंग शिवलकर,लक्ष्मण राऊळ,रमेश केळुसकर,सौ.श्रध्दा ताम्हणकर, सौ.कविता ताम्हणकर,सौ.आरोई केळुसकर,पत्रकार समिल जळवी,पत्रकार कृष्णा सावंत,सौ.मानसी राऊळ,सौ.श्रृतीका ताम्हणकर,पत्रकार आबा खवणेकर यांच्या सौभाग्यवती सौ.करिष्मा खवणेकर,वहिनी सौ.वेदिका खवणेकर,केळुस गावचे पुरोहित शेखर राऊळ आदी महीला व ग्रामस्थ उपस्थित होते.
